shankar-jagtap

संपूर्ण परिचय

shankar jagtap

महाराष्ट्रातील उद्योग नगरी म्हणून ख्यात असलेले पिंपरी चिंचवड शहर दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध आणि विकसित होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे दैनदिन जीवन अधिक सुखकर होण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण होत असलेल्या विकासाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे अभिमानाने सांगावे लागते. या शहराचा सर्वकष विकास आजवर होण्यासाठी अनेक धुरिणांनी आपले महत्त्वपूर्ण असे योगदान दिलेले आहे. मा. शंकर पांडुरंग जगताप हे असेच एक नाव ज्यांच्या तळमळीतून आणि अथक प्रयत्नांतून कधी काळी गावठाणे म्हणून परिचित असलेले अनेक भाग आज विकसित आणि समृद्ध झाली आहेत.

पुण्यापासून काहीसे किलोमीटरवर असलेले पिंपळे गुरव हे अगदी छोटेसे गाव. जेथे विकास तर दूरच परंतु अनेक पायाभूत सोयी सुविधाची देखील वानवा होती. अशा छोट्या गावात परंतु मनाने आणि मानाने मोठ्या असलेल्या सर्वसाधारण धार्मिक, अध्यात्मिक कुटुंबात इ.स. १९७४ साली मा. शंकर जगताप यांचा जन्म झाला. घराची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असली तरीही आपणही समाजाचे ऋणी असले पाहिजे आणि त्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण सदैव प्रयत्न केले पाहिजे हि आईवडिलांची शिकवण मनाशी बाळगून समाजसेवेचा वसा हाती घेतला. वडील बंधू स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांशी सुसंवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेवून त्या अधिकाधिक कशा कमी करता येतील यासाठी प्रयत्न सुरु केले.

आपल्या कुटुंबाचा, समाजाचा, आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधावयाचा असेल तर शिक्षणा शिवाय गत्यंतर नाही हे ध्यानात घेऊन मा. शंकर जगताप यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. अर्थात घरातील थोरामोठ्यांच्या आशीर्वाद तर होताच. समाजाचा सर्वांगीण विकास साधावयाचा असेल तर नक्कीच आर्थिक समीकरणे जुळणे गरजेचे असते. मा शंकर जगताप यांनी आपले उच्च शिक्षण एमबीए फायनान्स मधून केले. शेती मध्ये आपली आवड जोपासली. श्री शंकर जगताप यांनी ग्राहकहित जोपासत नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या आधारे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या बांधकाम क्षेत्रातदेखील एक मानाचे स्थान मिळवले आहे.

शैक्षणिक कार्य

आजवर आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा समाजासाठी कसा करता येईल याचा विचार करून त्यांनी विविध शैक्षणिक संस्थासाठी कार्य करणे सुरु केले. द न्यू मिलेनिअम इंग्लिश मीडियम स्कूल, सांगवी, पुणे. या संस्थेचे सचिव पद भूषवित त्यांनी परिसरातील विद्यार्थ्याना उत्तमोत्तम शिक्षण देण्यासाठी प्राधान्य दिले आहे.

तसेच चिंतामणी विद्यापीठ पुणे याचे संचालक पद भूषवित शिक्षण क्षेत्रातील आपल्या सीमा विस्तारल्या आहेत. आज या संस्थांच्या माध्यमातून हजारो यशस्वी विद्यार्थी घडत आहेत तसेच होतकरू गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व मदत करण्याचे कार्य करीत आहे.

क्रीडा क्षेत्र

पिंपरी चिंचवड मधील विद्यार्थी तरुणांना विविध खेळांची आवड निर्माण व्हावी त्यांनी विविध स्पर्धांमध्ये शहराचे प्रतिनिधित्व करावे तसेच क्रीडा क्षेत्राबद्दल प्रोत्साहन मिळावे या भावनेतून लक्ष्मणभाऊ जगताप कला क्रीडा अकॅडमीची स्थापन केली. या अंतर्गत स्केटींग, सायकलिंग व बास्केट बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच स्केटींग, सायकलिंग व बास्केट बॉल, लॉन टेनिस, बॅडमिंटन, स्वीमिंग, बुद्धीबळ, कॅरम, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी कुस्ती या स्पर्धांबरोबरच मॅरेथॉन सारखी भव्य स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली.

शारीरिक आणि मैदानी खेळांप्रती आवड निर्माण व्हावी यासाठी सन २०१० साली भैरवनाथ उस्तव समिती अंतर्गत “महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, राष्ट्रीय लॉन टेनिस, भव्य हाल्फ मॅरेथॉन स्पर्धा , सी.एम. चषक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात मोलाचा वाटा उचलला. सोबतच राज्यस्तरीय बॅडमिंटन, किक बॉक्सिंग शरिर सौष्ठव (बॉडी बिल्डर) स्पर्धा आयोजित करून खेळाडूंच्या गुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सन २०१५ पासून श्री शंकर जगताप यांच्या प्रेरणेतून "आमदार चषक क्रिकेट स्पर्धा " हि भव्य स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

राजकीय कार्य

आपल्याला मिळालेल्या संधीचा सुयोग्य वापर करीत पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. इ.स. २००७ ते २०१२ दरम्यान पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे नगरसेवक पद भूषवित शहरातील विविध लोकाभिमुख कार्य करण्याची संधी मिळाली पुढे क्रीडा समितीचे सदस्य आणि शहर सुधारणा समितीच्या माध्यमातून अधिक व्यापकपणे कार्य करत आले याचे समाधान आहे. विकसित शहराच्या निर्मितीसाठीची ध्येयधोरणे ठरविण्यामध्ये योगदान देता आले. जि संधी आपल्याला प्राप्त होते त्याचा पुरपूर वापर करून घेत आपल्या शहरासाठी जे जे चांगले ते ते करण्यास नेहमीच प्राथमिकता राहिली आहे.

श्री शंकर जगताप यांचे संघटन कौशल्य आणि स्थानिक प्रश्नांची सुयोग्य जाण असल्या कारणाने तसेच ते सोडविण्यासाठीची त्यांची तळमळ लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याची संधी सोपवली. आज चिंचवड विधानसभा मतदार संघाचे प्रमुख म्हणून कार्यभार यशस्वीपणे ते निभावत आहेत.

सामाजिक क्षेत्र

राजकीय जबाबदाऱ्या निभावताना समाज अधिक समृद्ध झालं पाहिजे यासाठी विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्ररंग गोशाळा ट्रस्ट, भैरवनाथ मित्र मंडळ, पिंपळे गुरव, पुणे, भैरवनाथ उत्सव समिती, पिंपळे गुरव, पुणे यामाध्यमातून लोकजागृती करण्याचे कार्य केले आहे. अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत.

स्वच्छतेचा पुरस्कार करीत स्वच्छ भारत अभियान, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन, दुष्काळग्रस्त भागांसाठी नाम फाउंडेशन मुख्यमंत्री सहाय्यता निधिस आर्थिक मदत, यशवंत चॅरिटेबल ट्रस्टच्यामार्फत राबविण्यात आलेल्या पवनामाई नदी सुधार प्रकल्पास श्रमदान, समाजातील विविध घटकातील तरुणांसाठी स्कील डेव्हलपमेंटचे कोर्सेस, तसेच सहकाराचे महत्त्व जाणून मा. आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालवत असलेल्या श्री गणेश सहकारी बँक, भैरवनाथ नागरी पतसंस्था, विजयराज नागरी पतसंस्था या संस्थांच्यामार्फत पुढाकार घेऊन नागरिकांना व युवकांना उद्योग, व्यवसाय, शिक्षण, घरबांधणी, वाहन खरेदी यासाठी आर्थिक मदत करून नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी मदत करण्यात येत आहे.

महिला सशक्तीकरण

पुरुषांच्या बरोबरीने आज महीला भगिनी देखील प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी पवनाथडी, भिमथडी, आदिवासी जत्रा यामध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून त्यांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे.

महिलांमधील कौशल्य विकास वाढावा यासाठी MS-CIT., शिवणकला, तांत्रिक उद्योजकता, पाककला अशा विविध कोर्सेसचे प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येतात. पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींना "नारीशक्ती वंदन" या अभियानांतर्गत सन्मानित करण्यात आले आहे.

कला क्षेत्र

शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक विकासाबरोबरच समाज कला - सांस्कृतिक दृष्ट्या देखील तेवढंच समृद्ध असणे गरजेचे असते. नागरिकांना आजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळा मिळावा, त्यांना आपल्या कुटुंबासमवेत काही खास आनंदाचे क्षण व्यतीत करता यावेत यासाठी हैप्पी स्ट्रीट सारखा भव्य सोहळा इस २०१९ पासून श्री शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये विवीध खेळ आणि योगा, व्यायाम, झुम्बा, नृत्य अशा विविध प्रकारांचा समावेश करीत हैप्पी स्ट्रीट कार्यक्रमाचे आयोजन करून नागरिकांचे मनोरंजन व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात आले.

सोबतच नागरिकांमधील कला गुणांना वाव मिळवा यासाठी हास्य कवी संमेलन दिवाळी पहाट, लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप करंडक “ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा”, पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ढोल ताशा वाद्य स्पर्धा, विजयादशमी निमित्त महाभोंडला व रावण दहन सोहळा आयोजित केला जातो.

सांप्रदायिक क्षेत्र

आपल्या समृद्ध धार्मिक परंपरा जपल्या पाहिजेत आपणां सर्वांना अध्यात्मातून नवी उर्जा मिळावी समाजामध्ये पुन्हा समृद्धी नांदावी यासाठी कीर्तन महोत्सव, दि.११ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर २०१२ - विश्वसंत सदगुरू श्री. वामनराव पै यांच्या शहानपण देगा देवा या विषयावर आनंदमेळावा. (दररोज ३० हजार नामधारकांना लाभ.) दि.१० डिसेंबर २०२२ ब्रम्हकुमारिज शिवानी दीदी यांचे संकल्प से सिद्धी व्याख्यान (१५ हजार नागरीक उपस्थित) तसेच दत्तजयंती निमित्त श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम, कासारवाडी येथे प्रतिवर्षी सलग ८ दिवस भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन, समाज प्रबोधनपर व्याख्याने, पंढरपुर वारी व दिंडी आदी कायक्रमाचे आयोजन श्री शंकर जगताप यांच्या पुढाकाराने केले आहे.

परमपूज्य पंडित मिश्राजी (सिहोर वाले) यांच्या उपस्थितीत “भव्य शिवपुराण कथेचे आयोजन” १५ सप्टेंबर २०२३ – ते २२ सप्टेंबर २०२३ या ७ दिवसांमध्ये १८ ते २० लाख नागरिकांनी घेतला लाभ.श्री शंकर जगताप यांच्या माध्यमातून रामजन्मभूमी अयोध्या येथे साकारण्यात आलेल्या भव्य राममंदिर दर्शनासाठी पिंपरी चिंचवड शहरातून (पिंपरी चिंचवड शहर ते अयोध्या पर्यंत) २०० आणि मावळ लोकसभेतून १४०० नागरिकांना मोफत दर्शनाची व्यवस्था करून देण्यात आली. तसेच प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संत मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर, चिंचवड. येथे भव्य सामुहिक रामरक्षा पठण कार्यक्रमाचे आयोजित केला त्याचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला.

रोजगार क्षेत्र

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर युवकांना नोकरी मिळवताना येणाऱ्या अडचणी लक्षात त्यांच्यातील कौशल्य विकास व्हावा यासाठी पुढाकार घेण्यात आला. तसेच दि. ०४ डिसेंबर २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातील अनेक गरजू तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आणि दिव्यांग बांधवांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करून जवळपास ४५०० युवकांना चांगल्या कंपनीत जॉब मिळवून देण्यात अग्रेसर भूमिका घेतली.

आरोग्य क्षेत्र

नौकरी व्यवसाय करताना होणारी धावपळ आणि बदलेली जीवनशैली याची सांगड घालण्यासाठी प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ असणे आवश्यक असे आहे. आपल्या भागातील नागरिकांना देखील काही आरोग्याच्या समस्या जाणवत असतील तर त्या कमी व्हाव्यात त्यांना उत्तमोत्तम उपचार मिळावेत यासाठी लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून ( सन २०१५ ते २०२४ ) दरवर्षी विनामूल्य अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन (आजपर्यंत ८ लाख रुग्णांनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ)करण्यात येत आहे. रक्तदान शिबिराद्वारे रक्ताची भासणारा तुटवडा कमी करण्यसाठी आजवर भागातील तरुणांनी नागरिकांच्या मदतीने प्रयत्न केला आहे. त्यासाठी वेळोवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.

दि.१४ फेब्रुवारी २०१९ महाराष्ट्र राज्याचे स्थूलताविरोधी पथकाचे ब्रँड अँबेसिडर डॉ. जगन्नाथ दिक्षित यांचे विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध या विषयावर जाहीर व्याख्यान घेण्यात आले याचा जवळपास २५ हजार नागरिकांनी लाभ घेतला. तसेच नागरीकांचे स्वास्थ्य उत्तमोत्तम असावे यासाठी दि.१८ जानेवारी ते २३ जानेवारी २००९ : सांगवी येथील पी.डब्ल्यू डी. मैदान येथे प. पू. स्वामी रामदेवजी महाराज यांच्या विज्ञान शिबिराचे आयोजन. (दररोज ३५ हजार साधकांना लाभ) देण्यात आला.

दि.११ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर २०१२ - विश्वसंत सदगुरू श्री. वामनराव पै यांच्या शहानपण देगा देवा या विषयावर आनंदमेळावा संपन्न करण्यात मोठी भूमिका बजावली. (याचा दररोज ३० हजार नामधारकांना लाभ.)

दि.२२ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०१३ - प. पू. श्री. श्री. रविशंकरजी यांचा ज्ञानगंगा व प्राणायम शिबीर आणि २८ राज्यातील नृत्यकलांचा कार्यक्रम (२५ हजार साधकांना लाभ) प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या कार्यात सहभाग

दि.१० डिसेंबर २०२२ ब्रम्हकुमारिज शिवानी दीदी यांचे संकल्प से सिद्धी व्याख्यान आयोजित करण्यात आले (१५ हजार नागरीक उपस्थित)

श्री. जगताप शंकर पांडुरंग

सर्व्हे क्र. 79/1, चंद्ररंग पार्क, सुदर्शन नगर, पिंपळे गुरव, पुणे - 411061

ई-मेल : jagtapshankar594@gmail.com

फोन नं. : 9850171111

      

© , जगताप शंकर पांडुरंग.