स्वामी रामदेव बाबा यांचे आरोग्य विज्ञान शिबीर, विश्वसंत सदगुरू श्री. वामनराव पै यांच्या "शहानपण देगा देवा" या विषयावर आनंदमेळावा. प.पू श्री. श्री. रविशंकरजी यांचा "ज्ञानगंगा व प्राणायम शिबीर", २८ राज्यातील नृत्यकलांचा कार्यक्रम, अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन, महाराष्ट्र राज्याचे स्थूलताविरोधी पथकाचे ब्रँड अॅम्बेसिडर डॉ. जगन्नाथ दिक्षित यांचे 'विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध' या विषयावर जाहीर व्याख्यान, ब्रम्हकुमारिज शिवानी दीदी यांचे 'संकल्प से सिद्धी' व्याख्यान अशा भव्यदिव्य कार्यक्रमांच्या आयोजनांच्या माध्यमातून श्री शंकर पांडुरंग जगताप यांची उत्तम संघटक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या भव्यदिव्य शिबिरांचा आणि उपक्रमांचा दहा लाखांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे.
भव्य - दिव्य कार्यक्रमासोबतच कीर्तन,प्रवचन आध्यत्मिक, सांगीतिक कार्यक्रम यांचे आयोजन तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्य विकास योजना, महिलांसाठी पवनाथडी जत्रा, भीमथडी जत्रा, आदिवासी महोत्सव यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती याशिवाय तरुणांसाठी रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. ज्याचा जवळपास ४५०० तरुणांना लाभ मिळाला आहे, आमदार चषक क्रिकेट स्पर्धा, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा तसेच व्हॉलीबॉल, कबड्डी, फुटबॉल, टेनिस, खो-खो, कॅरम, बुद्धिबळ, चित्रकला, रांगोळी, रनिंग अशा अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजनातून सर्वव्यापी विचार करणारा असा नेता म्हणून त्यांनी आपली ख्याती निर्माण केली आहे.
सर्व्हे क्र. 79/1, चंद्ररंग पार्क, सुदर्शन नगर, पिंपळे गुरव, पुणे - 411061
ई-मेल : jagtapshankar594@gmail.com
© , जगताप शंकर पांडुरंग.

मा. नरेंद्रजी मोदी, पंतप्रधान, भारत
भारताला जागतिक स्तरावर प्रभावशाली, आर्थिकदृष्ट्या मजबूत प्रगत राष्ट्र म्हणून पाहिले आहे. सर्वसमावेशक विकास, आधुनिक पायाभूत सुविधा आणि पुढाकारांद्वारे मजबूत अर्थव्यवस्था यावर माझे लक्ष केंद्रित आहे. सर्व नागरिकांसाठी सुधारित राहणीमानासह भारताला आत्मनिर्भर, तांत्रिकदृष्ट्या प्रगतीशील आणि पर्यावरणाबाबत जागरूक देश बनवण्याचे माझे उद्दिष्ट आहे.

मा. देवेंद्रजी फडणवीस, उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र
औद्योगिक विकासाद्वारे आर्थिक विकासाला चालना देणे, आधुनिक वाहतूक नेटवर्कसह पायाभूत सुविधा वाढवणे आणि कृषी प्रगतीला चालना देणे ही माझी दृष्टी आहे. समतोल प्रादेशिक विकास आणि तेथील सर्व रहिवाशांचे जीवनमान चांगले राहून महाराष्ट्राला गुंतवणुकीचे प्रमुख ठिकाण बनवण्याचे माझे उद्दिष्ट आहे.

मा. चंद्रशेखरजी बावनकुळे, अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र
पक्षाची तळागाळातील उपस्थिती मजबूत करणे, सर्व स्तरांवर नेतृत्व वाढवणे, पक्षाची अखंडता राखणे, कारभारात पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि लोकशाही मूल्यांचे पालन करणे हे पक्षाचे मुख्य उद्दिष्ट राहील. सर्व नागरिकांच्या आकांक्षा आणि गरजा प्रतिबिंबित करणाऱ्या समृद्ध, स्वावलंबी महाराष्ट्र करणे हे माझे ध्येय आहे.

मा. मुरलीधर मोहोळ, खासदार पुणे, केंद्रीय राज्यमंत्री
शहरी पायाभूत सुविधा वाढवणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे आणि कार्यक्षम कचरा व्यवस्थापन करणे हे माझे व्हिजन आहे. शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणे यावर माझा भर आहे. पुण्याला एक सुरक्षित, स्वच्छ शहर बनवणे व येथील रहिवाशांसाठी उच्च दर्जाचे जीवनमान असलेले मॉडेल शहर बनवणे हे माझे उद्दिष्ट आहे.